पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे पाच रुग्णांच्या मृत्यूची मंगळवारी (दि. 2) नोंद झाली असून, 36 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर, कळंबोली व नवीन पनवेल असे चार आणि कर्जतमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. पनवेल मनपा हद्दीत 23, माणगाव सहा, पनवेल ग्रामीण व रोहा प्रत्येकी दोन, उरण, सुधागड, म्हसळा प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1180 आणि मृतांची संख्या 55 झाली आहे. दरम्यान, महाडमधून सायंकाळी उशिरा सहा नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यात वैद्यकीय अधीक्षकासह दोन डॉक्टर व एका नर्सचा समावेश आहे. दुसरीकडे नवी मुंबईत मंगळवारी 93 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Check Also
पनवेलमध्ये गुरुवारी ’संदीप वैभव…आणि कविता’
कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिननिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ कवी विष्णू वामन …