आमदार रमेश पाटील यांचा आरोप
मुरूड : प्रतिनिधी
वादळग्रस्तांना मदत मिळाली परंतु मच्छीमारांच्या झालेल्या बोटींची भरपाई अद्याप दिली जात नाही कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे मच्छिमारी गेली कित्येक दिवस बंद होती. त्यातच निसर्ग वादळामुळे कोळी समाज हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मार्ग कर्मण करीत आहे. शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र हे पंचनामे करताना मच्छीमार गाव आणि मच्छीमारांचे नुकसान डावलले गेले असल्याचे मत भाजपचे विधान परिषदचे आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळाने नुकसान केले. मुरुड येथील अगरदांडा बंदर व उरण येथील बंदरात उभ्या असलेल्या होड्या हेलकावे खात एकमेकांवर आढळल्यामुळे सुमारे शेकडो होड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या किनार्यावर नुकतेच आलेले निसर्ग या चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषदचे आमदार रमेश पाटील यांनी शिष्टमंडळासह नुकतेच बाधित कोळीवाडे आणि मच्छीमार गावांची पाहणी केली. रायगडमधील निडी, खारआपटी, रोहा, तळा, रहाताड, मांदाड, मुरुड, मजगाव, बोरली, कोरले, रेवदंडा, साळाव आदी गावांची पाहणी करून येथील नुकसानग्रस्तांशी चर्चा केली.
वादळी लाटांनी मासेमारी नौकांमध्ये पाणी भरल्याने इंजिनाचे झालेले नुकसान, होड्या एकमेकांवर अथवा किनार्यावर आढळून मोठे नुकसान झाले आहे, वादळापूर्वीची समुद्रात टाकलेली जाळी पुन्हा परत आणू न शकल्याने, जाळी वाहून गेल्याचे पंचनामे अथवा किनार्यावर शाकारुन ठेवलेल्या नौकांवरील बंदिस्ती उडून गेल्याने झालेले नुकसानीचे, घरातीचे छत आणि कौले उडाल्याने पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीचे झालेले नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचे निदर्शनास आणले आहे. पाहणी दौर्यात कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, सरचिटणीस राजहंस तपके, युवा अध्यक्ष अॅड. चेतन पाटील, प्रा. अभय पाटील, उल्हास वाटकरे, गणेश पिठे, अॅड. यशवंत साधु आदी उपस्थित होते.
तळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य अधिकार्यांची पडलेली निवासस्थाने, मुरुड येथील मासळीबाजार तत्काळ शासनाकडून उभा करून देण्यात यावा, मासळीचा दुष्काळ अथवा चक्रीवादळामध्ये झालेले मच्छीमारांचे नुकसान असो यामध्ये नेहमी शासन कोळी समाजावर अन्याय करीत आहेत.
-आमदार रमेश पाटील