महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे

भाजप नेते आशिष शेलार यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी

‘ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत’, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला शुक्रवारपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझे, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत, असेही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. त्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले. तर सुरेश प्रभू यांना सुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झाले, अन्य नावे मी घेत नाही. तर आता नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले. कोकणाला काही मिळाले की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखते? असा सवाल करत याचा संताप कोकणवासीयांना मध्ये आहे. येणार्‍या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकार्‍यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले.

सरकारविरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केले गेले. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत, अशा शब्दांत शेलार यांनी टीका केली.

‘मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची शिकवणी लावावी’

शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे, परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी, असा सल्ला भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply