Breaking News

बाजारातील चांगल्या कंपन्यांचा शोध

आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे या दुसर्‍या भागात समजून घेऊ यात.

कंपनीच्या निवडीबाबत आपण मागील आठवड्यात आपण मोठ्या कंपन्या व प्रवर्तकांच्या हिश्याबाबत पाहिलं होतं. आता त्यानंतर मी अवलंबत असलेली गोष्ट म्हणजे, प्रवर्तकांनी गहाण ठेवलेल्या शेअर्सचं प्रमाण: अनेकदा आपण वाचतो की, अमूक एका कंपनीच्या प्रवर्तकांनी इतके इतके शेअर्स अथवा क्ष किंमतीचे शेअर्स गहाण ठेवले (pledged) आहेत. कोणत्याही कंपनीस एक्स्चेंजला ही माहिती कळवणं बंधनकारक आहे. त्यामुळं प्रचलित फायनॅन्शिअल वेब साईट्सवर आणि बीएसई/एनएसईच्या वेबसाईटवर ही माहिती आपल्याला मोफत पाहता येऊ शकते. प्रवर्तकांनी किती शेअर्स अथवा किती किंमतीचे शेअर्स गहाण ठेवलेत, यापेक्षा असे गहाण ठेवलेले शेअर्स प्रवर्तकांच्या एकूण शेअर संख्येच्या किती टक्के आहेत, हे तपासणं जास्त महत्वाचं ठरू शकतं. यामागील उद्देश हा की समजा प्रवर्तकांनी असे शेअर्स चढ्या भावात गहाण ठेवले तर त्यांना त्याच्यासमोर कर्जदेखील न्यूनतम भावात शेअर्स गहाण ठेवण्याच्या तुलनेत जास्त मिळू शकेल. परंतु समजा काही कारणानं हे शेअर्स प्रवर्तकांना कर्ज फेडून सोडवता आले नाहीत, किंवा कर्जाचे हप्ते थकल्यास ठराविक मुदतीनंतर किंवा गहाण ठेवलेल्या शेअर्सचे भाव ठराविक पातळीपेक्षा खाली येऊ लागल्यास कर्जदार बँक किंवा संस्था असे त्यांच्याकडील गहाण ठेवलेले शेअर्स विकू शकतात. त्यामुळं असे गहाण शेअर्स खूप जास्त प्रमाणात असल्यास त्यांची थेट परस्पर विक्री होताना त्याचा परिणाम शेअर्सचे भाव पडण्यावर होतो. त्यामुळं असे हे गहाण ठेवलेले शेअर्स प्रवर्तकांकडील एकूण शेअरसंख्येच्या 2-5 टक्के असतील तर फारसं काळजीचं कारण नाही. परंतु हेच प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक असेल तर मी त्या कंपनीस ब्लॅकलिस्टमध्ये ठेवतो.

पुढील महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा समभाग भांडवलावरील परतावा (ROE) व व्यवसायात एकूण लावलेल्या भांडवलावरील परतावा (ROCE). ROE म्हणजे शेअरहोल्डर्सच्या गुंतवणुकीवरील परतावा तर ROCE म्हणजे एकूण भांडवलावरीलम्हणजे शेअरहोल्डर्सच्या भाग भांडवलाव्यतिरिक्त कर्जाद्वारे, डिबेंचर्सद्वारे व बॉण्ड्सद्वारे उभं केलेलं एकत्रीत भांडवल व त्यावरील एकूण परतावा. ROE काढताना निव्वळ नफा विचारात घेतात तर ROCE काढताना निव्वळ नफ्याऐवजी कार्यकारी नफा विचारात घेतला जातो. म्हणजेच घसारा काढल्यानंतर व्याज व कर कमी करण्याआधी असलेला नफा. तसंच ROCE मध्ये इक्विटी भांडवल + दीर्घावधीसाठीची कर्ज, अशा दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या जातात.

ROE = (P-T/ Equity+ReservesSurplus) x 100
ROCE = EBIT / Capital Employed (Total -ssets – Current Liabilities or Total Equity + Total Debt)

समभागधारकांच्या दृष्टिकोनातून आणि पी / ई गुणोत्तर निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून ठजए अधिक उपयुक्त आहे. परंतु आपण जर आपण एक कंपनी म्हणून संपूर्ण व्यवसायाकडे पाहत असल्यास ठजउए अधिक उपयुक्त आहे. जागेअभावी जास्त खोलात न जाता जागतिक कीर्तीचे गुंतवणूक गुरु वॉरेन बफे या बाबतीत म्हणतात की ज्या कंपन्यांचे ROC व ROCE जवळपास समान आहेत परंतु 20% च्या वर आहे अशा कंपन्यांना ते प्राधान्य देतात, आपणही या बाबतीत हाच मूलमंत्र का नको आत्मसात करायला?

वाढती विक्री : मागील वर्षीसारखा अपवाद वगळता कोणतीही कंपनी आपले विक्रीचे आकडे चढे ठेऊ शकत असेल तर यातून अनेक गोष्टी निष्पन्न होतात – कंपनीची ओळख, बाजारात कंपनीच्या उत्पादनांना असलेली सततची मागणी, उत्तम विपणन, पुरवठा साखळी, इ. त्यामुळं प्रत्येक तिमाहीचे विक्रीचे आकडे तपासावेत.

सलग नफा – आपण कोणाशी पार्टनरशिप करताना नुकसानीत असणार्‍या व्यवसायाऐवजी ज्या व्यवसायात नफा आहे, अशाच व्यवसायात गुंतवणूक करतो त्याचप्रकारे इथंदेखील सलग नफा कमावणारी कंपनीच गुंतवणुकीसाठी निवडावी. अर्थात काही कॅपिटल गुड्स, टेलिकॉम ऑपरेटर व तत्सम कंपन्यांना नफ्यामध्ये येण्यासाठी आयटी अथवा वित्तीय संस्थांच्या तुलनेत अनेक वर्षं लागू शकतात अशा कंपन्यांच्या बाबतीत इतर गोष्टी तपासाव्यात.

यापुढील गोष्ट म्हणजे नफ्याचे मार्जिन : कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी किती टक्के निव्वळ नफा आहे, हे नक्की तपासावं. कमीतकमी 15-25 टक्के प्रॉफिट मार्जिन्स असलेली कंपनी आदर्श मानली जाते. वरील सर्व गोष्टी कंपनीच्या संकेतस्थळावर, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट्सवर अथवा ीलीशशपशी.ळप  या वेबसाईटवर सहज मिळू शकतात. यापुढील काही बाबी पुढील लेखात..

सुपर शेअर : अल्ट्राटेक सिमेंट

मागील आठवड्यात सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी 400 अंशांची वाढ नोंदवली. दुसरीकडं सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सना मागणी दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट तसेच रॅमको सिमेंट या उद्योगातील दिग्गज कंपन्यांनी वाढ दर्शविली. मार्चमध्ये सिमेंटच्या दरात अपेक्षित किंमतवाढ लागू झाली असून दक्षिण आणि पूर्वेतील महिन्यात 20-30 रुपये प्रति बॅग तर इतर भागामध्ये 10 ते 15 रु. / बॅग दर वाढले आहेत. मागील वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीच्या तुलनेत या वर्षी विक्रीमध्येदेखील वाढ दिसून येत आहे व हीच वाढ पुढील तिमाहीतदेखील असेल, या अंदाजामुळं आठवडाभर सिमेंटचे शेअर्स तेजीत राहिले. सिमेंट क्षेत्रात बाजारमूल्यानुसार सर्वांत मोठी (1.96 लाख कोटी रु.) असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सनी नवीन सर्वोच्च उच्चांक प्रस्थापित केला. अल्ट्राटेक सिमेंट अशी अनेक उत्पादनं तयार करतात, जी पायाभूत सुविधांपासून बांधकामापर्यंतची गरज पूर्ण करते.  ज्यात ऑर्डीनरी पोर्टलँड सिमेंट (ओपीसी), पोर्टलँड ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट (पीएससी), पोर्टलँड पोझोलाना सिमेंट (पीपीसी), व्हाइट सिमेंट व व्हाइट सिमेंट आधारित उत्पादनांसह रेडी-मिक्स काँक्रिट याचा समावेश आहे. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 122.8 टक्क्यांची वाढ नोंदली गेली असून ती 1584 कोटी रुपयांवर गेली आहे. तर कंपनीच्या निव्वळ विक्रीत 17टक्के वाढ झाली असून विक्री 12254 कोटी रुपये झाली आहे. दैनिक आलेखावर शेअर्सनी मागील पाच दिवस सलग वाढ दर्शवली असून दीर्घकालावधीसाठी या कंपनीकडून मोठ्या अपेक्षा ठेवता येऊ शकतील.

-प्रसाद ल. भावे

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply