मुंबई :प्रतिनिधी
शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची आठ तास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रवींद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
रवींद्र वायकर हे मंगळवारी (दि. 21) दुपारच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर तब्बल आठ तास त्यांची ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. आठ तास शिवसेना आमदार रवींद्र वायकर हे ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. त्यांना नेमके कोणत्याप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांच्या अनुशंगाने ईडीने रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स बजावले असल्याचे कळतेय. त्यानुसार रवींद्र वायकर हे चौकशीसाठी हजर झाले होते. आज झालेल्या या चौकशीतून आता नेमके काय बाबी समोर आल्यात, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
चौकशीपूर्वी गुप्तता; तर्कवितर्कांना उधाण
रवींद्र वायकर हे माजी मंत्री होते. गेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्याच्या ईडी चौकशीचे नेमके कारण काय होते, यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेय, मात्र अद्यात या चौकशीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून कोणत्याप्रकरणी रवींद्र वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, हे कळू शकलेले नाही.