पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये (एसएमडीएल) महाविद्यालयाच्या एन. एन. एस. विभागाद्वारे आयोजित युवकांचा ध्यास : ग्राम – शहर विकास हे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर स्व. छाया आत्माराम पाटील स्कूल मानघर, पनवेल येथे संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कार्यवाहक गीताताई पालरेचा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे उपस्थित होते. मंडळाचे संघटक पोपटराव पवार यांनी पाणी व निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र पालवे, भागवताचार्य ह.भ.प. महेश महाराज साळुंखे, बांठीया हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी भगवान, बांठिया हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.
रायगड जिल्हा समन्वयक डॉ. बी. बी. जाधव यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. भारती आरोटे यांनी आभार मानले. ग्रुप ग्रामपंचायत नानोशीचे सरपंच संगीता पाटील, राजेंद्र पाटील, उपसरपंच अनिरुद्ध पाटील, ग्रामपंचायत सदस्य पारधी ताई व इतर सदस्य, ग्रामस्थ, एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पनवेल मनपाचे उपायुक्त विठ्ठल डाके, प्रा. चिंतामण धिंदले, प्रा. गजानन चव्हाण, विकास चव्हाण, महेश महाराज, विवेक भोपी यांनी विविध विषयावर व्याख्याने दिली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महेश महाराज, सुजान मिश्रा, मयुरी शिंदे, महेश बोराटे , डॉ. आर. बी. राठोड, डॉ. एस सी लहुपचांग,मुकेश कांबळे, अॅड. प्रवीण पाटील, श्री. किरण गोंधळी, प्रा. चंद्रकांत मुकादम यांनी प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुश्री सुळे व आभार प्रा. अविनाश पवार यांनी व्यक्त केले. प्रमाणपत्र वितरण डॉ. भारती आरोटे यांनी केले. प्रभारी प्राचार्या डॉ. मनीषा बनसोडे, सुधागड एज्युकेशन संस्था पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्यवाहक गीताताई पालरेच्या, सचिव रविकांत घोसाळकर आदींचे विविध प्रकारे सहाय्य व मार्गदर्शन झाले. मुंबई विद्यापीठाचे एन. एस. एस. संचालक प्रा. सुधीर पुराणिक, रमेश देवकर, प्रा. सुशिल शिंदे यांचेही सहाय्य लाभले.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …