Breaking News

भाजपच्या ई-श्रम कार्ड शिबिराला प्रतिसाद

नवी मुंबई : बातमीदार

भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांनी ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन सानपाडा येथे केले होते. जवळपास 50 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत कार्ड काढून घेतले.

मोदी सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या ई-श्रम कार्ड योजनेविषयी या वेळी जागृती करण्यात आली व माहिती देण्यात आली. यापुढेदेखील ई-श्रम कार्ड शिबिर आयोजित करण्यात येईल, असे

राजेश राय यांनी सांगितले.

या वेळी उत्तर भारतीय मोर्चा सचिव दीपा शाह, रजनी लखोटिया,  उपाध्यक्ष  अजय सिंह, अतुल सरोज, विजय सिंह, अरविंद उपाध्याय, विकास निकम, रमेश दुबे, अनिल सिंह, वीरेंद्र जायसवाल, संतोष गुप्ता आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply