Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची सेतूबाधित मच्छीमारांसाठी

एमएमआरडीएसोबत बैठक

 

पनवेल : रामप्रहर वृत्त

न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या न्हावा गावातील 789 मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार एमएमआरडीएचे आयुक्त यांच्यासोबत बुधवारी  (दि. 16) बांद्रा येथील कार्यालयात बैठक झाली. एमएमआरडीचे अधिकारी स्वतः या विभागात येऊन कागदपत्रांसंदर्भात असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचे या बैठकीत एमएमआरडीए आयुक्तांनी आश्वासित केले आहे. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारी, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, उरण उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, सागर ठाकूर, गव्हाण उपसरपंच विजय घरत, युवा नेते अमर म्हात्रे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक आदी उपस्थित होते. एमएमआरडीए बरोबर अनेक वेळा झालेल्या बैठकीत स्थानिक मच्छिमारांच्यावतीने 789 बाधित मच्छिमारांची यादी सादर करण्यात आली होती. काही त्रुटी दूर करून सादर करण्यात आलेल्या यादीला मान्यता देताना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही एमएमआरडीए आर्थिक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी एमएमआरडीचे आयुक्त यांच्यासोबत आज बैठक घेतली. 2016 ते 2019 पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे का दिले नाही या बद्दल चर्चा होवून योग्य ते निर्णय घ्या अन्यथा काम बंद केले जाईल अशी रोखठोक भूमिका या बैठकीत घेण्यात आली होती. त्यावेळी आयुक्तांनी एमएमआरडीचे अधिकारी स्वतः या न्हावा भागात येऊन कागदपत्रांची त्रुटी दूर करतील, असे आश्वासन एमएमआरडीच्या वतीने देण्यात आले आहे. याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी न्हावा व गव्हाण ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी प्रत्येकी पाच कोटी निधी कधी देणार अशी विचारणा केली त्यावर लवकरच विकासकामांसाठी निधी देण्याचे एमएमआरडीच्या अधिकार्‍यांनी मान्य केले आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची शिष्टाई कामी आली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply