Breaking News

चिरनेर-खारपाडा रोडवरील पात्रादेवी घाट धोकादायक

अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईची नागरिकांची मागणी

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रोडवर अवजड कंटेनर ट्रेलर आणि  दगडाची खडी, ग्रीट अवजड वाहतूक करणार्‍या डंपरची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. त्या डंपर मधून  ग्रीट, खडी नियमित पडत असल्याने इंद्रायणी डोंगराजवळील पात्रादेवी घाटात वाहनाचा अपघातास कारणीभूत ठरु शकते.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून कोकणाकडे जाण्यारा हा सुलभ मार्ग आहे. या मार्गावर चोवीस तास चाकरमानी व पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ सुरूच असते. तसेच याच मार्गावरून खडी ग्रिटचे  अवजड भरलेली  वाहतूक होत आहे मात्र या अवजड खडी ग्रिटमुळे घाटा मध्ये रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे छोट्या वाहनांना विशेष करून मोटारसायकल  स्वारांना याचा धोका जास्त प्रमाणात होत आहे. या आगोदर या ठिकाणी  मोटारसायकल स्वारांचे अपघात होऊन जीव गमावले आहेत. अवजड वाहतूक होत असतांना मात्र वाहतूक पोलिसांना

या चिरनेर- खारपाडा रोडवरील पात्रादेवी घाटातील प्रकाराचा सूत मात्र पता नाही ही शोकांतिका आहे.

तसेच या रस्त्यावरील  जेएनपीटीतुन येणारे अवजड कंटेनर ट्रेलर यांची आर्शिया गोदामाकडे जाण्याची रुटिंग  पळस्पेफाटा मार्गे असतांना  वेळ आणि इंधन वाचविण्यासाठी बेकायदेशीरपणे चालणार्‍या अवजड कंटेनर ट्रेलरची वाहतूक वाढली आहे. अशा अवजड वाहतुकीवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

डंपरमधून अवजड वाहतूक होऊन खडी ग्रिट पडून  अपघातास कारणीभूत ठरत असेल तर पाहणी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल.

-अशोक गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण वाहतूक शाखा

रस्त्यावर जर अशा प्रकारची अवजड वाहतूक होत असेल तर आमच्याकडून वाहतूक पोलिसांना लेखी स्वरूपात कसळविण्यात जाईल.

-नरेश पवार, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उरण

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply