Breaking News

माणगावच्या नाट्यगृहाला निधीची साडेसाती!

बांधकाम रखडल्याने रसिकांची निराशा

माणगाव : सलीम शेख

शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता मात्र हे काम अर्धवट राहिल्याने नाट्यगृह उभारणी कागदावरच राहिली आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे शासनांच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून चार कोटी रुपये खर्चाचे नाट्यगृह बांधण्यास मंजुरी मिळाली होती. त्याला तब्बल दोन वर्ष लोटले. या नाट्यगृहाची प्रेक्षक बसण्याची क्षमता 500 आहे. हे कमी क्षमतेचे नाट्यगृह माणगावात उभारल्यास या ठिकाणी दर्जेदार नाटके आणणे किंवा सादर करणे आयोजकांना परवडणारे नाही. या नाट्यगृहाची बाल्कनी वाढवून किमान 700 प्रेक्षक क्षमता केल्यास आयोजकांना दर्जेदार नाटके आणणे परवडेल अन्यथा हे नाट्यगृह सभा संमेलनासाठीच उपयुक्त ठरणार असल्याची चर्चा नाट्य रसिकातून व्यक्त होत असून प्रेक्षकातून या कमी क्षमतेच्या नाट्यगृहाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

रायगड जिल्ह्यातील पनवेल, रोहा, महाड येथे नाट्यगृहे आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, येथे नाट्यगृहे आहेत. नाट्य चळवळ रुजावी यासाठी माणगावात नाट्यगृह उभारावे, अशी मागणी येथील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून करीत होते. शासनांच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून चार कोटी रुपये खर्चाचे नाट्यगृह बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. हे नाट्यगृह उभारणीचे सुरु आहे. हे काम एका ठेकेदारामार्फत केले जात असून सध्यस्थितीत हे काम 15 ते 20 टक्के झाले असून ते बेसमेंटपर्यंत झाले आहे. संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी झालेल्या कामाचे मूल्यांकन करून निधी शासनाने अदा केल्यास हे काम जलदगतीने होईल. अशी चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply