Breaking News

सततच्या बत्ती गूलमुळे नागरिक हैराण

विविध कार्यालयांचे कामकाजही होतेय ठप्प

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना सततच्या होणार्‍या वीज खंडितमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे ठिकाणी विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून बँका, लहान -मोठ्या आस्थापनांचे कामही ठप्प होत आहे. महावितरणकडून नागरिकांना अवास्तव बिले देण्यात येतात मात्र अखंडित वीजपुरवठा करण्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात उष्णतेमध्ये वाढ झाल्याने वीजेचा वापरही वाढला मात्र राज्य शासनाकडे वीज निर्माण करण्यासाठी कोळशाचा पुरेसा साठा नसल्याने महावितरण सुरळीत वीजपुरवठा करण्यास अपयशी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून राज्य शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. असे असले तरीदेखील सामान्यांना भरमसाठ रकमेची बिले दिली जात आहेत. वीजपुरवठा सुरळीत कधी होणार याबाबत विचारणा केली असता महावितरणमधील अधिकारी, कर्मचारी उद्धट व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याच्या तक्रारी तर सामान्यांकडून कायमच होत आहेत मात्र याकडेही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply