पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शुक्रवारी (दि. 6) अभिवादन केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, सरचिटणीस श्याम साळवी, अॅड. शिव कांबळे, अक्षय मिसाळ, अमोल जाधव, अनुसूचित मोर्चाचे शहर अध्यक्ष रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, संतोष म्हस्के, प्रकाश सोनावळे, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष महेंद्र मोरे, तालुका अध्यक्ष सुनील वाघपंजे, कामगार नेते अनिल जाधव, अजय जाधव, भाजप नेते रमेश मुंडे, महापालिका उपायुक्त कैलास गावडे, डॉ. वैभव विधाते, बाबासाहेब राजळे, रविकिरण घोडके, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, कार्यकारी अभियंता सुधीर साळुंखे, प्रभारी अधीक्षक रोशन माळी, भांडार विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या वतीने पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली होती तसेच मंडप घालून सुशोभीकरण करण्यात आले. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे या ठिकाणांहून दादर येथील चैत्यभूमीकडे अभिवादनास जाणार्या अनुयायांसाठी चहा, पाणी आणि बिस्किटांची सोय महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती.
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …