Breaking News

कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीच्या संवर्धनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कासाडी नदीपात्रात अत्यंत घातक दूषित पाणी सोडले जाते. त्यामुळे परिसर अत्यंत प्रदूषित झाला आहे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या नदीत होणार्‍या प्रदूषणाबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत.
घातक वायू रसायने प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडल्यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली असून या नदीच्या संवर्धनासंदर्भात मी वारंवार शासनाचे लक्ष वेधले आहे. शासनाकडून नदीच्या संवर्धनाबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे असून तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कासाडी नदीच्या संवर्धनाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात यावे, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply