पनवेल : रामप्रहर वृत्त
मुख्यमंत्री आणि भाजप विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. त्याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला.
भाजपच्या बुधवारी (दि. 4) झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा गुरुवारी (दि. 5) मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. या सोहळ्यास अनेक दिग्गज नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला
Check Also
आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …