उरण : वार्ताहर
सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी शिरसागर (पोर्ट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत बुधवार (दि. 27) सायंकाळी एसटी स्टँड चारफाटा उरण येथे जातीय दंगा काबू प्रतिबंधक योजनेची रंगीत तालीम पोलिसांकडून घेण्यात आली. दंगा काबू प्रतिबंधक योजनेमध्ये उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील, दोन निरीक्षक, सहा सहाय्यक निरीक्षक/निरीक्षक, 25 अंमलदार, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर भटे, एक निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, 10 अंमलदार, मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, एक निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, पाच अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे द्रोणागिरी फायर ब्रिगेड व उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. अशाप्रकारे जातीय दंगा काबू प्रतिबंधक तालीम यशस्वीरित्या पार पडली.