Breaking News

हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयाचे नाव कायमच ठेवणार

नवीन इमारतीला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव

पनवेल : प्रतिनिधी
महापालिकेचे  हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय  आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहिल असे परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढून स्वातंर्य सैनिकांचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे वारस अ‍ॅड. नागेश हिरवे यांनी समाधान व्यक्त केले. आयुक्त गणेश देशमुखांसह त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूऱ, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.
पनवेल महापालिकेच्या 24 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेलमधील भूखंड क्रमांक 127 अ येथे शाळेसाठी नवीन इमारत बांधली आहे. या इमारतीत सरस्वती विद्यामंदिर, हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय व कन्याशाळा या तिनही शाळा एकत्रित करून एकाच इमारतीत  सुरू करण्याचा  निर्णय घेण्यात आला होता. या शाळेच्या नवीन इमारतीला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव  एकमताने मंजूर करण्यात आला होता.
यामुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नातू अ‍ॅड. नागेश हिरवे यांनी महापालिकेसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्त्येचा प्रयत्न ही केला होता. इमारतीला नाव देण्याच्या विषयावरून समाजात वेगवेगळे मत प्रवाह असल्याचे कारण देऊन पुढील आदेशा पर्यंत  महापालिका आयुक्तांनी 8 जून रोजी परिपत्रक काढून प्रशासकीय दुष्ट्या शाळेच्या नवीन इमारतीत हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय समायोजित करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात येत असून पुढील आदेशा पर्यंत विद्यमान  हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आहे त्याच जागी आहे त्याच नावाने सुरू राहील  असे कळवले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply