Breaking News

जागतिक योग दिन उत्साहात साजरा

सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोशिश फाऊंडेशनच्या वतीने जागतिक योग दिन सोमवारी (दि. 21) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात साजरा झाला. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात योग प्रशिक्षक रचना शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांनी योगसाधना केली, तर सूर्यनमस्कार स्पर्धेसही योगप्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमास महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर, सचिव चिन्मय समेळ, भाजप तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, अयुब अकुला आदी उपस्थित होते.
गटनिहाय विजेते
महिला ः 12 ते 21 वर्षे – प्रथम जयश्री लांडे (5555 रु. व चषक), द्वितीय प्रियांका जोमराज (3333 रु. व चषक), तृतीय अनघाश्री एस. (2222 रु. व चषक), चतुर्थ मृण्मयी ठाकूर व प्रणाली माने (1111 रु. व चषक); 22 ते 35 वर्षे – प्रथम पूर्वा मनुरकर (5555 रु. व चषक), द्वितीय शुभांगी जवेरी (3333 रु. व चषक), तृतीय ऋतुजा तुषार (2222 रु. व चषक), चतुर्थ पूजा लोंढे व रुही तालस्कर (1111 रु. व चषक); 35 ते 60 वर्षे – प्रथम प्रिया सिंग (5555 रु. व चषक), द्वितीय अंजली देवानी (3333 रु. व चषक), तृतीय गीता पवार (2222 रु. व चषक), चतुर्थ छाया जोगडिया व अश्विनी बोरुडे (1111 रु. व चषक); पुरुष ः 12 ते 21 वर्षे – प्रथम वरुण सकपाळ (5555 रु. व चषक), द्वितीय देवराज पाटील (3333 रु. व चषक), तृतीय सर्वेश गुप्ता (2222 रु. व चषक), चतुर्थ देवेश जोमराज व मनोमय भोसले (1111 रु. व चषक); 22 ते 35 वर्षे – प्रथम विक्रम आपटे (5555 रु. व चषक), द्वितीय आदित्य उपाध्ये (3333 रु. व चषक) तृतीय मयुरेश कामाने (2222 रु. व चषक), चतुर्थ किरण मोरे व अक्षय सापने (1111 रु. व चषक); 35 ते 60 वर्षे – प्रथम विकास देशमुख (5555 रु. व चषक), द्वितीय निलेश कालेकर (3333 रु. व चषक), तृतीय पुनीत शारदा (2222 रु. व चषक), चतुर्थ मकरंद आठवले व आदित्य मिश्रा (1111 रु. व चषक).

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply