भाजपने वेधले अधिकार्यांचे लक्ष
नवी मुंबई : प्रतिनिधी
प्रभागाची पावसाळ्यापूर्वी नाले व गटार साफसफाई शिरवणे गाव व नेरुळ सेक्टर 1 परिसरात व्हावी या अनुषंगाने गुरुवारी नेरुळ ब विभाग अधिकारी नागराळे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार, विजय नाईक, अरुणा भोईर, मीनाक्षी हिलाल आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील विविध ठिकाणी पावसाळापूर्व नाले व गटार सफाई सुरू झाली आहे. शिरवणे आणि नेरुळ सेक्टर 1 परिसरात ती तातडीने सुरू करावीत, अशी मागणी माधुरी सुतार यांनी केली आहे. या दोन्ही कामांची सुरुवात तातडीने करण्यात येतील असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी नागराळे यांनी या वेळी दिले.