Breaking News

उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सांगता

पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने मल्लविद्या कुस्ती संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत झाली.
या कार्यक्रमासाठी रेडक्लीपच्या प्राचार्य सौ. अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर, राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक तसेच नवी मुंबई पोलिस क्रीडा प्रमुख संपत्ती येळकर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन इंग्लंड संजय चव्हाण, वस्ताद श्रीहरि तरंगे, वायरलेस विभागाचे बसवराज गोवे आणि पालकवर्ग उपस्थित होता.
मुख्यालयातील प्रशिक्षक, मुलांचा उत्साह, खेळ व गुणवत्ता बघून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पोलीस मुख्यालयातील तसेच बाहेरील येणार्‍या खेळाडूंसाठी कुस्ती मॅट तसेच ओपन जिम देण्याचे आश्वासन दिले. याबद्दल सर्व कोच, खेळाडू व पालक यांनी आभार व्यक्त केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply