Breaking News

राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे बुधवारी पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 18, 19 आणि 20व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय (स्वायत्त) येथे बुधवारी (दि. 5) सायंकाळी 4 वाजता हा समारंभ होणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी व साहित्यिक रामदास फुटाणे, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, ललित मासिकाचे स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे
आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष
विष्णू सोनावणे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या दिवाळी अंकास 75 हजार रुपये, व्दितीय 35 हजार, तर तृतीय 20 हजार रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह, उत्कृष्ट कथेसाठी सात हजार रूपये, उत्कृष्ट कविता व उत्कृष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी 2500 रुपये, उत्कृष्ट विशेषांकास पाच हजार रुपये, उत्कृष्ठ मुखपृष्ठ पाच हजार रुपये, बालसाहित्याच्या सर्वोत्कृष्ट अंकास 7500 रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक विजेत्या अंकास 30 हजार रुपये, व्दितीय 15 हजार रुपये आणि तृतीय 7500 रुपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply