पनवेल : वार्ताहर
केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयकर विभाग पनवेल या ठिकाणी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते.
पनवेल परिक्षेत्र अतिरिक्त आयकर आयुक्त अभिषेक सिंग यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. खांदेश्वर व मानसरोवर स्टेशन, कामोठे परिसरातील पुरातन गणेश मंदिर, ऐश्वर्या हॉटेल, अक्षय टॉवर आणि परत आयकर कार्यालय पनवेल असा स्पर्धेचा मार्ग होता. सायक्लोथॉनचे 10 किमी अंतर होते. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे आणि अल्पोपाहार देऊन सांगता करण्यात आली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …