Breaking News

सीआयएसएफ कर्मचार्‍यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिर

उरण ः वार्ताहर

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल युनिट ओएनजीसी मुंबईच्या उरण कंटींजेन्टमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिबिर उत्साहात झाले.शिबिराचे उद्घाटन सोमवारी (दि. 21) सीआयएसएफ युनिट ओएनजीसी मुंबईचे कमांडेंट ललित शेखर झा यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ मुंबई रिजनचे विविध युनिटमधील जवान सहभागी झाले. हे शिबिर शनिवारी (दि. 26) पर्यंत चालणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे एक तंत्र आहे ज्याद्वारे तणाव आणि चिंता दूर करून जीवनात आनंद आणि आनंद आणण्याची कला शिकली जाते. आज देशात आंतरिक सुरक्षा ड्यूटी, इलेक्शन ड्यूटी, कायदा आणि सुव्यवस्था ड्यूटी यामध्ये केंद्रीय सशस्त्र बलाचा फार  मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यामुळे जवानांनवर कामाचा फार ताण पडतो. यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply