पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 32 धोकादायक इमारती पालिकेने घोषित केल्या आहेत. यापैकी काही इमारतींंध्ये आजही रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे या अशा धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांचा जीव धोक्यात येत असतो. अनेक ठिकाणी या धोकादायक इमारतीत राहणार्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. पालिका क्षेत्रात 32 इमारती पालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. संबधित इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याच्या सूचना पालिकेने संबधित विभागाला दिले आहेत. पालिका क्षेत्रात या धोकादायक इमारतीत शेकडो रहिवासी वास्तव्यास आहेत. यामुळे या रहिवाशांचा जीव टांगणीला लागून राहिला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अबालवृद्धांचा समावेश आहे. पालिकेने संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. या व्यतिरिक्त सिडकोच्या क्षेत्रातील शेकडो इमारतींचादेखील समावेश यामध्ये आहे. दरम्यान, घर सोडले तर राहायचे कुठे? भाडोत्री घराचे भाडे भरणार कसे? असंख्य प्रश्न या रहिवाशांना सतावत आहेत, मात्र दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.
महापालिकेने धोकादायक इमारतींसंदर्भात स्थापन केलेल्या कमिटीच्या सर्वेनुसार धोकादायक 32 इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत.
-कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका