Breaking News

अलिबागेतील ताजपूर शाळेचा आवाज घुमणार आकाशवाणीवर

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील ताजपूर येथील प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी जिया कैलास झावरे (इयत्ता तिसरी) हिची ‘शाळेबाहेरची शाळा‘ या उपक्रमांतर्गत मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचे प्रसारण लवकरच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारीत करण्यात येणार आहे.

ताजपूर प्राथमिक शाळा ही अलिबाग तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकीत आदर्श शाळा आहे.कोरोनाकाळात शाळा बंद असूनसुद्धा विद्यार्थ्यांचे  शिक्षण सुरू राहावे यासाठी नागपूर आयुक्त कार्यालय, प्रथम एज्युकेशन संस्था आणि आकाशवाणी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळेबाहेरची शाळा‘ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी कोकण विभागीय समन्वयक ऋतुजा पाटील यांनी ताजपूर शाळेची शिफारस केली होती. त्यानुसार तिसरीची विद्यार्थिनी जिया कैलास झावरे, उपक्रमशील मुख्याध्यापक नाना भोपी, पालक सुवर्णा झावरे यांची शाळेबाहेरील शाळा या उपक्रमासाठी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवड करण्यात आली. या आकाशवाणी केंद्राने जिया झावरे हिची मुलाखत घेतली असून, ती लवकरच प्रसारीत करण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे पवार, अलिबागचे गटशिक्षण अधिकारी श्री. कोकाटे, विस्तार अधिकारी श्री. पिंगळा, केंद्रप्रमुख श्री. म्हात्रे यांनी ताजपूर प्राथमिक शाळेचे अभिनंदन केले.

Check Also

यंदाचा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमागील वर्षी नमो चषक क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याचप्रमाणे …

Leave a Reply