Breaking News

नेरूळ भाजपच्या वतीने विविध कार्यक्रम

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नेरूळ प्रभाग 34 भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी, कुकशेत गावच्या क्रिडांगणावर चार दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन रविवारी (दि. 17) माजी सरपंच बाळाराम पाटील, पांडुरंग कडू, अशोक मोरावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत नवी मुंबईतील 24 संघांनी सहभाग घेतला आहे.

याचप्रमाणे मंगळवारी (दि. 19) दुपारी 2 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत कुकशेत गावातील व्यायामशाळेमध्ये एमजीएम रूग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिर होणार आहे. बुधवारी (दि. 20) नेरूळ सेक्टर 6मधील दर्शन दरबार येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिर, सायंकाळी 6.30 वाजता झुलेलाल मंदिरातील हॉलमध्ये सारसोळे, कुकशेत व नेरूळ सेक्टर 6मधील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि सत्कार तसेच दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन माजी मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.

नेरूळ सेक्टर 8मधील एल मार्केटजवळील भाजप कार्यालयासमोर दहावी-बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन शनिवारी (दि. 23) केले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भाजप कार्यकर्त्यांकडून, करण्यात आले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply