Breaking News

महाड प्रांताधिकार्यांनी दिली दरडप्रवण गावांना भेट

अलिबाग : जिमाका

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी बुधवारी (दि. 20) पोलादपूर तालुक्यातील कातळी (कामतवाडी) आणि कोंढवी या दरडप्रवण गावांना भेट दिली.

प्रांताधिकारी पुदलवाड यांनी या वेळी दरडप्रवण भागाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना अतिवृष्टीच्या कालावधीत स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. तसेच दरडीची लक्षणे ओळखणे, आपत्ती येण्यापूर्वी सतर्क राहणे, रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट याबाबतदेखील सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांनी सांगितलेल्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात अशा संबंधित कर्मचार्‍यांना प्रांताधिकारी पुदलवाड यांनी सूचना दिल्या.

पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्यासह संबंधीत मंडळ अधिकारी, तलाठी, संपर्क अधिकारी आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply