पनवेल : रामप्रहर वृत्त
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुरुवारी (दि. 20) मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला.
पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणी दौर्याला सुरुवात झाली. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच पनवेल तालुक्यात आले होते. त्यांचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस अमरिश मोकल, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, प्रीतम म्हात्रे, रूपेश नागवेकर, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, किसान मोर्चाचे अतुल बडगुजर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पनवेल ते हातखंबा (रत्नागिरी) असा हा पाहणी दौरा होता. या संदर्भात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
Check Also
उलवे नोडमध्ये साकारणार्या शिवसृष्टीतील ‘रामशेठ ठाकूर मैदाना’चे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवा नोडमध्ये साकारत असलेल्या शिवसृष्टीतील मैदानाला शिवजयंतीच्या पवित्र दिवशी माजी खासदार लोकनेते …