पनवेल : रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण-कोपर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप कष्ट उपसले, त्यांनी फक्त रयतेचाच विचार केला, त्यामुळे सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत, असे प्रतिपादन केले.
यासोबत कार्यक्रमाला उपस्थित असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की, स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांचे कार्य अविरतपणे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी पुढे सुरू ठेवले. लोकनेते रामशेठ ठाकूर हे परिस आहेत. ज्यांना ज्यांना त्यांचा स्पर्श झाला त्यांचे सोने झाले, असे सांगून गव्हाण विभागाचा विकास होण्यामागे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे, असे मत महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.
या जयंती सोहळ्याला पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper