Breaking News

गावठाण संघाने जिंकला श्री रामशेठ ठाकूर चषक

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने न्हावेखाडी येथे श्री रामशेठ ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा न्हावेखाडी येथील म्हेश्वरी मैदानात 16 ते 19 फेबु्रवारीदरम्यान रंगली. या क्रिकेट स्पर्धेत अर्णवी इलेव्हन गावठाण या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाला 50 हजार रुपये आणि भव्य चषक देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेत खारकोपर ब या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला असून त्यांना 25 हजार रुपये व भव्य चषक देण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभास ज्येष्ठ नेते कान्हाशेठ ठाकूर, सागरशेठ ठाकूर, अरुणशेठ ठाकूर, सी. एल. ठाकूर, राम मोकल, श्रीधर मोकल, अनंत ठाकूर, सदाशिव ठाकूर, राजेश ठाकूर, रोशन ठाकूर, स्वप्नील ठाकूर, सुजित ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply