Breaking News

मुरूड नगर परिषदेची प्रभाग रचना रद्द

सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर

मुरूड : प्रतिनिधी

नगर परिषदेची प्रारुप प्रभाग रचना रद्द झाल्याने मुरूडमधील इच्छुक उमेदवाराचा हिरमोड झाला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक  विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. या विधयेकातील तरतुदीने जुनी प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकार नव्याने प्रभागरचना निश्चित करण्यासाठी प्रक्रिया राबविणार आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुका काही महिने लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार मुरूड नगर परिषदेची प्रभाग रचना मंजूर होऊन ती प्रसिद्धसुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच निवडणूक घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता प्रभाग रचना रद्द करण्यात आल्याने आता नगर परिषद निवडणूक कधी होणार असा प्रश्न राजकीय नेत्यांना पडला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply