Breaking News

रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाची धुरा काकाजीनी वाडी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात उद्योजक कल्पेश परमार यांनी स्विकारली, तर अ‍ॅड. हितेश राजपूत यांनी सचिव पदाचा आणि तुषार तटकरी यांनी खजिनदारपदाचा कार्यभार स्विकारला. प्रमुख अतिथी आमदार प्रशांत ठाकूर व मंजू फडके यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.  विद्यमान अध्यक्ष गुरुदेवसिंग कोहली, सचिव विनोद गुर्मे, खजिनदार मधुसुदन मालपाणी यांनी आपापल्या पदाची सुत्रे अनुक्रमे कल्पेश परमार, अ‍ॅड. हितेश राजपुत आणि तुषार तटकरी यांच्याकडे सोपवली. या वेळी शुभदा भगत संपादीत विश्वचक्र या बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ पनवेल इडस्ट्रीयल टाऊनचा सभासद असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. रोटरीचे कार्य उत्तमप्रकारे सुरू असून त्यात सहभागी होण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. कधी आवश्यकता भासली तर फक्त साद द्या, प्रशांत ठाकूर मदतीसाठी सदैव पुढे असेल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

मंजू फडके यांनी रोटरीचे कार्य कसे चालते याबद्दल विस्तृत माहिती देऊन रोटरीच्या कार्यात प्रत्येक रोटेरियनने तन-मन-धन अर्पून सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करुन नुतन अध्यक्ष कल्पेश परमार यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी बालड आणि मिहीका भगत यांनी केले.

या वेळी जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये जॉईंट सेक्रेटरी व चेअरमन एन्व्हार्यमेंट अध्यक्ष गुरुदेवसिंग कोहली, चेअरमन फंडरेझिंग डॉ. जयकुमार भंडारकर, प्रेसिडेंट नॉमिनी व सार्जंट अ‍ॅट आर्मस् चारुदत्त भगत, उपाध्यक्ष व क्लब ट्रेनर पीपी सैफूद्दिन व्होरा, डायरेक्टर क्लब अ‍ॅडमिनिस्ट्रेशन जितेंद्र बालड, डायरेक्टर रोटरी फाउंडेशन व ट्रस्टचे चेअरमन पीपी. अरविंद सावळेकर, डायरेक्टर मेंबरशिप पीपी डॉ. प्रमोद गांधी, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल डॉ. जयश्री पाटील, डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल निलेश पोटे, डायरेक्टर पब्लिक इमेज ट्रस्ट सेक्रेटरी पीपी प्रमोद वालेकर, डायरेक्टर न्यू जनरेशन पीपी अलीअसगर व्होरा, डायरेक्टर व्होकेशनल व चेअरमन लिटरसी पीपी विष्णू म्हात्रे, आयटी ऑफीसर चेअरमन नॉन मेडिकल  ऋग्वेद कांडपिळे, चेअरमन ऑनगोईंग प्रोजेक्ट (एचआयएस) पीपी सुधीर कांडपिळे, बुलेटिन व मॅगेझिन एडिटर शुभदा भगत, चेअरमन सोशल इव्हेंटस् संजय जैन, चेअरमन फेलोशिप पीपी राजेंद्र ठाकरे, चेअरमन स्पोर्ट्स सुहास मराठे, चेअरमन मेडिकल प्रोजेक्टस डॉ. सुरेश कारंडे, चेअरमन ग्लोबल गँट व सीएसआर  पीपी प्रकाश श्रृंगारपुरे, चेअरमन टीआरएफ फाऊंडेशन सुनील अरोरा, चेअरमन मेंबरशिप रिटेंशन पीपी किशोर चौधरी, परमनंट इनव्हायटी आमदार प्रशांत ठाकूर आदींचा समावेश आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply