Breaking News

शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण ग्रामपंचायतीच्या शेष फंडातून बुधवारी (दि. 6) शेलघर येथे पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

रायगड जिल्हा परिषदेच्या शेलघर येथील शाळेपासून ते सुनील भगत यांच्या घरापर्यंत आणि पुढे कातकरी वाडी इथपर्यंत ही पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. त्या कामाचे भूमिपूजन बुधवारी आले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य योगिता सुहास भगत व शेलघरचे ग्रामस्थ अजय भगत, सुहास भगत, सुनील भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच या पाइपलाइनच्या कामाचे कंत्राटदार अविनाश भगत तसेच आदिवासीवाडीवरील महिला उपस्थित होत्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply