मुंबई ः प्रतिनिधी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट येथे रेल्वे सूचना व तक्रार नोंदणी केंद्र सुरू झाले आहे, तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ, कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा प्रकल्पांचे लोकार्पण बुधवारी (दि. 17) मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
रेल्वे प्रवाशाच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण व समाधान करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चगेट रेल्वेस्थानकात केंद्र सुरू करण्यात आले आहे तसेच अंबरनाथ आणि कोपर स्थानकातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या स्थानकांना भेट देत होम प्लॅटफॉर्मची निर्मिती करून लाखो प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …