Breaking News

पमपा प्रभाग 17मध्ये विजेच्या खांबांची उभारणी

माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे प्रयत्न

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल मनपाचे माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या प्रयत्नाने महापालिका क्षेत्रातील प्रभाग 17 येथील नवनाथ नगर वसाहत, रेल्वेस्टेशन रोड येथे विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

गेल्या अनेक वर्षांपासून नवनाथ नगर वसाहतीमध्ये रस्त्यावर वीजेचे खंब नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारात चाचपडत आपली वाट शोधावी लागत होती. याबाबत रहिवाशांनी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, माजी नगरसेविका सुशिला घरत, प्रभाग ‘ड’च्या माजी सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांना सांगितल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने नवनाथ नगर वसाहतीमध्ये रस्त्यावर विजेचे खांब बसविण्यात आले. त्याबद्दल रविाशांनी त्यांचे आभार मानले. या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात, उत्तर रायगड झोपडपट्टी सेल संयोजक राहुल वाहूळकर, अनुसूचित जाती मोर्चा शहर मंडल सदस्य विजय झिरे, महिला कार्यकर्त्या जरीना शेख, सुनील बगडे, राजू झिरे, हिरामण, साळुंखे, तानाजी शिंदे, आसमा शेख, सोनाली महाडिक, रशिदा शेख, नागम्मा बुटणाळ व रहिवासी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply