Breaking News

बसची टे्रलरला जोरदार धडक; एकाचा मृत्यू, 19 प्रवाशी जखमी

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्गावर मध्यरात्री अडीच सुमारास उभ्या ट्रेलरला पाठीमागून आलेल्या एसटी बसची धडक बसली. झालेल्या अपघातात एसटी बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सोलापूर येथून अर्नाळा विरार या ठिकाणी एसटी बस (एम एच 09 इएम 9641) ही घेऊन बसचालक अशोक गायखे (वय 33, रा. उस्मानाबाद) हा चालला होता. या वेळी पनवेल जवळील एक्स्प्रेस महामार्ग क्रमांक 10/ 500 च्या हद्दीत ट्रेलर (एमएच 46 एएफ 2864) उभा होता. त्याला या एसटी बसची पाठीमागून जोरदार धडक बसली. झालेल्या अपघातात बसचालकाचा गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू झाला, तर बसमधील 19 प्रवाशी जखमी झाले. त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलिसांचे पथक, आयआरबीचे गस्त पथक, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात उपचारार्थ पाठविले तसेच अपघात गस्त वाहनांना बाजूला करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply