पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व केलेल्या पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत. त्या अनुषंगाने खारघरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. 22) करण्यात आले. या कामांमध्ये खेळाची मैदाने व उद्यानातीन कामांचे, मलनिस्सारण वाहिनी व गटाराच्या कामाचे भूमिपूजन, नगरसेवक निधीमधून उभारण्यात आलेल्या चावडीचे लोकार्पण आणि विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खारघर सेक्टर 15 प्लॉट नंबर 36, सेक्टर 19 प्लॉट नंबर 132, सेक्टर 21 प्लॉट नंबर 42, सेक्टर 19 प्लॉट नंबर 369 ए या ठिकाणी खेळाचे मैदान व उद्यानातीन कामांचे तसेच मुर्बी गावात मलनिस्सारण वाहिनी व गटाराच्या कामाचे भूमिपूजन तसेच नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या नगरसेवक निधीतून बांधण्यात आलेल्या चावडीचे लोकार्पण व नव्याने नागरिकांसाठी उभारण्यात येणार्या विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या विकासकामांच्या शुभारंभावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना समीर कदम, नगरसेवक हरेश केणी, अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, रामजी बेरा, अनिता पाटील, आरती नवघरे, नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, किरण पाटील, कीर्ती नवघरे, दिलीप जाधव, संतोष शर्मा, युवा मोर्चाचे नितेश पाटील, शुभ पाटील, सर्जेराव मेंगाणे, रामचंद्र पाटील, नवनीत मारू, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, विजय बागडे, भरत कोंढाळकर, गहिनीनाथ नावडेकर, अशोक पाटील, आनंद मुद्गल, सुरेश वाघमारे, सोनू सूर्यवंशी, आकाश शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, खारघर पसिरात सिडको उद्याने उभारताना मुलभूत सुविधाही दिली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या उद्यानांमध्ये विविध सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, या भूमिपूजनाआधी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 19मधील मार्केट यार्डजवळील भूखंडाची पाहणी करून आढावा घेतला.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …