Breaking News

विद्याभवन शिक्षण संकुलात टिळकांची जयंती

नवी मुंबई : बातमीदार

पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात  लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.

मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी टिळकांची करारी वृत्ती, द्रष्टेपणा, लोकसंघटन, लेखन, बालपण, शिक्षण आणि तुरुंगवासासंबंधीत गोष्टी भाषणातून व्यक्त केल्या. अविनाश कुलकर्णी यांनी मंडालेचा तुरुंगवास, गीतारहस्य, ओरायन या बाबतीत टिळकांचे वेगळेपण सिद्ध करणार्‍या गोष्टी सांगितल्या. नूतन गवांदे यांनी टिळकांच्या गुणांची ओळख करून देत प्रत्येकाने टिळकांचे गुण आत्मसात करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, जयश्री तिपायले, अविनाश कुलकर्णी, दत्तात्रय आटपाडकर तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिमा राणे आणि श्रावणी कांबळे या विद्यार्थिनींनी केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply