नवी मुंबई : बातमीदार
शासनाने 2018 साली प्लास्टिक, थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे, मात्र तरीही नवी मुंबईत बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे. सीबीडी विभाग कार्यालयाने विभागात दुकानांमध्ये छापे टाकले. यात तब्बल 300 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या व एक लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
पालिका आयुक्ता अभिजित बांगर यांनी प्लास्टिक पिशव्या वापरणार्यांवर व पिशव्या ठेवणार्या दुकानदारांवर कारवाईचे आदेश् दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार बेलापूर कार्यक्षेत्रात घनकचरा विभागाचे उपायुक्त राजळे व सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी विभाग कार्यालयातील सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी, अतिक्रमण अधिकारी, कर्मचारी यांच्याद्वारे सिंगल युज प्लास्टिक विरोधी दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली. एकुण दंड रक्कम एक रुपये वीज वसुल करण्यात आला आहे. 300 किलो प्रतिबंधात्मक प्लॅस्टिक जमा करण्यात आले.
महाराष्ट्र शासनामार्फत प्लॅस्टिक आणि धर्माकोल अविघटनाशिल वस्तुचे उत्पादन, वापर विक्री, हाताळणुक आणि साठवणुकीबाबत प्रसिध्द करण्यात आली होती. 1 जुलै 2022 पासुन केंद्र शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णतः बंदी घातलेली आहे.
संपुर्ण सीबीडी विभाग प्लास्टिक मुक्त करण्यासाठी यापुढेसुध्दा अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशव्या वापरांवर भर द्यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.