Breaking News

बीसीटी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये ‘उमंग’

वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयाचे 10वे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ ‘उमंग 2019-20’ शनिवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपले कलाकौशल्य दाखवले.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवि भोईर, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहराध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, युवा मोर्चाचे शेखर तांडेल, कामगार नेते सुरेश पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कामोठेच्या
प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply