Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

कर्जतमध्ये ध्वज खरेदीसाठी गर्दी

कर्जत : बातमीदार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कर्जत नगर परिषद हद्दीमध्ये हर घर झेंडा… हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रभागनिहाय जनजागृती रॅली

तसेच तिरंगा ध्वज विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेतले आहेत. दरम्यान, बुधवारी (दि. 10) शहरातील दहिवली, आकुर्ले, गुंडगे आणि भिसेगाव भागात शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रॅली काढून जनजागृती केली.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी कर्जत शहरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेने शहराती सर्व प्रभागात ध्वज विक्री केंद्रे सुरू केली आहेत. त्यात पाच हजार तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. आतापर्यंत 1435 ध्वजाची विक्री झाली आहे.

कर्जतमध्ये हर घर झेंडा… हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी शहरातील अभिनव प्रशाला, डोंबे विद्या निकेतन, जनता विद्यालय, रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच इंग्लिश मिडीयम स्कूल, कन्या शाळा, डॉन बॉस्को आदी शाळांकडून शहरातील प्रत्येक भागात जनजागृती रॅली काढल्या जात आहेत.

बुधवारी दहिवली, आकुर्ले, गुंडगे आणि भिसेगाव भागात विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली होती. भिसेगाव येथील रॅलीमध्ये नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेविका पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे तर गुंडगे भागातील रॅलीमध्ये नगराध्यक्षा जोशी, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, नगरसेवक उमेश गायकवाड, वैशाली मोरे तसेच पालिकेचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, बांधकाम विभागाचे रवी लाड,  अविनाश पवार, कल्याणी लोखंडे, रुचिता शिंदे सहभागी झाले होते.

रोह्यात नगर परिषदेच्या वतीने जनजागृती

रोहे : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता रोहा नगर परिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 10) सकाळी  शहरात रॅली काढण्यात आली होती.

रोहा नगर परिषद कार्यालय येथून या जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला. विविध घोषवाक्यांचे फलक, स्वातंत्र्यसेनानींच्या प्रतिमा हातात घेत विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. ही जनजागृती रॅली दमखाडी, मेहेंदळे हायस्कूल, राम मारुती चौक, बाजारपेठ मार्गे पुन्हा नगर परिषद कार्यालयात आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला. मुख्याधिकारी धीरज चव्हाण, नायब तहसीलदार राजेश थोरे, माजी नगरसेवक अहमद दर्जी, समिर सकपाळ, महेंद्र दिवेकर, रवी चाळके, नगर परिषद अधिकारी निवास पाटील, रुपेश पाटील, नितीन शिंदे यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, नागरिक, पत्रकार, व्यापारी तसेच विविध सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply