Breaking News

धवन म्हणतो, मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

‘माझ्याबाबत होणार्‍या टीकांना मी कधीच प्रत्युत्तर देत नाही; कारण मी माझ्याच विश्वात असतो,’ अशा शब्दांत भारताचा सलामीवीर शिखर धवनने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये एकही शतक झळकावू न शकल्याने धवनच्या कामगिरीवर टीका होऊ लागली होती, पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात धवनने 143 धावांची कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. या पार्श्वभूमीवर धवनने त्याचे विचार मांडले. तो म्हणाला, मला नको असलेली कोणतीही माहिती मी बघायलाच जात नाही. त्यामुळे माझ्या अवतीभवती काय घडतेय, काय बोलले जात आहे, त्याची मला माहितीच नसते, तसेच मी माझ्याच विश्वात रमलेला असतो. त्यामुळे मला कोणत्या विषयावर किंवा कुठल्या दिशेने विचार करायचा आहे, ते मीच ठरवतो.

‘तणावाच्या परिस्थितीतही जो शांत राहू शकतो, तोच जिंकू शकतो. त्यामुळे गोष्टी मनासारख्या घडत नसल्या, तरी दुःखी न होता, केवळ आपले चित्त एकाग्र करण्यावर भर देतो. मी स्वतःशीच संवाद साधून मनातले नकारात्मक विचार काढून टाकतो. स्वतःला अधिकाधिक सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो,’ असेही धवन म्हणाला.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply