Breaking News

मुरूडमध्ये साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

मुरूड : प्रतिनिधी

शहरातील आझाद चौकात सोमवारी (दि. 15) सकाळी मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार रोहन शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. या वळी शालेय विद्यार्थ्यांनी राष्टभक्तीवर आधारीत चित्तथरारक प्रात्यक्षिकेसादर केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी मर्दानी खेळांचे आयोजन मुरूड नगर परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे, तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अमित पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर येथील शस्त्रअभ्यासक विनोद साळोखे  यांच्या 18 जणांच्या पथकाने रन हलगी, घुमक व कैताळ या पारंपरिक वाद्यांच्या तालावर तलवारबाजी, दांडपट्टा, फरी गडणा, लाठीकाठी  आदिंची चित्तथरारक प्रात्यक्षिके या वेळी सादर केली. या पथकातील शिबेत राजे साळोखे (वय 6), संस्कार चोगले (वय 8), शंभुराजे साळोखे (वय 10) यांची दांडपट्ट्यावरील पकड तर प्राजक्ता भिसेकर, श्रेयस जाधव, सोमेश पाटील, साक्षी पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तलवारबाजी व लाठी-काठीतील चापल्य उपस्थितांना भावले. तर तलवारीने मावळ्यांच्या मानेवर व पोटावर काकडी कापणे या खेळामुळे प्रेक्षक आवाक झाले.

तरुण पिढीला जुन्या मर्दानी खेळांची ओळख व्हावी आणि युवा पिढीने सदृढ व्हावे, शारिरीक कसरतीचे महत्व जाणून निरामय जीवन जगावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.

-महेंद्र दळवी, आमदार 

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply