Breaking News

रोह्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो चा उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी

भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस  सोमवारी (दि. 15) रोह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात करण्यात आला. तालुक्यातील देवकान्हे येथील प्राथमिक शाळेत युवा मोर्चाचे रोहा तालुका सरचिटणीस अविनाश कान्हेकर यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर महादेववाडी येथील शाळेत  स्वयंपाक घरासाठी आवश्यक असेलेली गॅस शेगडी  युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, सरचिटणीस अविनाश कान्हेकर, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, भाजप कामगार सेलचे तालुका अध्यक्ष विलास डाके, राजमुद्रा फाउंडेशनचे कार्यध्यक्ष राजेश भगत,  देवकान्हे शाळा कमिटी अध्यक्ष विश्वनाथ थिटे, भास्कर घाग, अनिल खंडागळे, निखिल वाळंज,  महादेववाडी शाळा समिती अध्यक्ष निलेश सुतार, गणेश जंगम, जयेश मोहिते, सागर डाके, सॅमी डबीर, ज्ञानेश्वर सुटू, मुख्यध्यापक सचिन टिकुले यांच्यासह भाजप कार्यकर्ते, धाकेश्वर मित्र मंडळ तसेच महिला मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ  या वेळी उपस्थित होते.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply