Monday , February 6 2023

माणगावजवळ दोन ट्रेलरची धडक; चालक जखमी

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील विळे गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. 5) सकाळी दोन ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक ट्रेलरचालक जखमी झाला आहे.

मुंबईकडून पॉस्को कंपनीकडे निघालेला ट्रेलर (एमएच-46, एएफ-1719) आणि कंपनीतून मुंबईकडे निघालेला ट्रेलर (आरजे-51, जीए-1560) या दोन गाड्यांमध्ये विळे पेट्रोलपंपासमोर बुधवारी सकाळी आठ वाजता समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका गाडीवरील चालक विक्रम केशव प्रसाद हे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस नाईक अनिल वडते करीत आहेत.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply