Breaking News

स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रीवर्धन भाजपकडून क्रांतीस्तंभ

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना मानवंदना

श्रीवर्धन : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीवर्धन भारतीय जनता पार्टी कडून सोमजाई मंदिराच्या पटांगणात असलेल्या क्रांतिस्तंभाला तसेच पेशवे मंदिरातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेला श्रीवर्धन म्हसळा व मुरुड या तालुक्यांचे मिळून जंजिरा संस्थान अस्तित्वात होते. देश स्वतंत्र झाला तरीही जंजिरा संस्थान भारत देशात विलीन झालेले नव्हते. जंजिरा संस्थान देशात विलीन व्हावे, यासाठी त्या वेळेला मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला. सदर झालेल्या क्रांतिकारी उठावानंतर श्रीवर्धन म्हसळा व मुरुड हे तीन तालुके भारत देशात विलीन झाले. स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य  पत्करलेल्या व कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ या क्रांतीस्तंभाची उभारणी करण्यात आली होती. या क्रांती स्तंभावर महादेव सदाशिव पेडसे व विष्णू चिंतामण जोशी अशी नावे लिहिलेली आढळून येतात.

श्रीवर्धन सारख्या छोट्या गावात जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीची पेशवाईची सूत्रे स्वीकारणार्‍या पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. तसेच सोमजाई मंदिराचे पटांगणात असलेल्या क्रांतिस्तंभालादेखील मानवंदना देण्यात आली. या वेळी श्रीवर्धन तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत शिंदे, रायगड जिल्हा चिटणीस मनोज गोगटे, भाजपा महिला शहर अध्यक्षा रूपा सुखदरे, हिंदू महासभा अध्यक्ष देवेंद्र भुसाणे, शहर कमिटी अध्यक्ष आदेश पाटील, शहर चिटणीस लक्ष्मण पावशे यासह भाजपचे सर्वपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply