पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील एका अल्पवयीय युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरारी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पीडित तरुणीची पेण तालुक्यातील वाशी परिसरात एका हळदी समारंभात दोन तरुणांसोबत ओळख झाली होती. यातील ओळखीचे एकाशी प्रेमात रूपांतर झाले. त्यातून त्या तरुणांनी तिचा गैरफायदा घेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी पीडितेला तिच्या घरच्यांना तिच्यासोबत केलेले प्रकार सांगण्याची व बदनामी करण्याची, तसेच तिच्या घरच्यांना मारण्याची धमकी देऊन वाशी भागात विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला.
या प्रकरणात सुमारे 10 ते 12हून अधिक जण सहभागी असल्याची बोलले जात आहे. 1 मे 2021 ते 29 जानेवारी 2022च्या दरम्यान आळीपाळीने बलात्कार करण्यात आला असून या घटनेने पेण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 376, 376 (ड), 354 (अ), 254 (ड), 506, पोक्सो अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलिसांनी 29 जानेवारी रोजी रात्री 9च्या सुमारास अटक केली असून आणखी तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 5 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी पोलीस सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बाळा कुंभार अधिक तपास करीत आहेत.
लग्नाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पेण ः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता 17 वर्षांची असून तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन राजमाची वाडी येथील आरोपीने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्याशी डिसेंबर 2020 ते 2021पर्यंत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करीत आहेत.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …