Breaking News

मुंबई प्रभादेवीत भाजप दहिहंडी सराव शिबिर

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातात.

दरम्यान, सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा सहभागी झाले होते.

भाजपा मुंबईचे सचिव सचिन शिंदे यांनी या सराव शिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान, मुंबईतील गोविंदा  पथकांच्या सुरक्षेसाठी भाजपाच्या वतीने विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाचा सुमारे दहा लाख रुपयांचा विमा उतरवला जात आहे. गोविंदा पथकांनी याचा लाभ घेण्यासाठी त्वरीत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन सचिन शिंदे यांनी केले आहे. या वेळी बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या या दहीहंडी सराव शिबिराला गोविंदा पथकांनी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदविला. दादर, प्रभादेवी, वरळी या परिसराने नेहमीच सण परंपरा आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि भावुकतेने जपले आहेत. या सराव शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सर्व प्रभादेवी ही उत्सवमय आणि परिसर भाजपामय दिसून आले.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply