Breaking News

पटोलेंची गुंडागर्दी चालू देणार नाही

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इशारा

नवी मुंबई : प्रतिनिधी

अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शुटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार या दोघांना आमचा पाठींबा असून रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी रिपब्लिकन, या नावाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, माजी महापौर सुधाकर सोनवणे, मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, बेरोजगार आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप, महिला अध्यक्ष शिलाताई बोदडे, युवक अध्यक्ष विजय कांबळे, अ‍ॅड. यशपाल ओहोळ, शशिकला जाधवआदी उपस्थित होते. 

रिपब्लिकन पक्षाचा एकही खासदार नसताना, नरेंद्र मोदी यांनी दुसर्‍यांदा आपल्याला मंत्रीमंडळात स्थान दिले. कुणावर टिका टिफ्पणी न करता आमच्या पक्षाचे काम सुरू आहे. कुणाला टिका करायची आहे, त्यांनी खुशाल टिका करावी, मात्र दुसर्‍यावर टिका करून आपला पक्ष वाढत नाही. असे सांगतानाच काही लोकांनी आपल्या पक्षाचे नाव बदलले, मात्र मी आपल्या पक्षाचे नाव बदलणार नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले. 

रिपब्लिकन पक्ष व त्याची ताकद वाढत असून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती जमातीचे लोक येत आहेत. त्यामुळे देशातील विविध राज्यात रिपब्लिकन पक्ष पोहचल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून आपल्यावर अनेक लोक टिका करत असतात, मात्र अशा टिका करणार्‍यांना कुणीही विचारत नाही, आपण चांगल काम करत राहिलो, तर समाज आपोआप आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. नवी मुंबई महापालिकेची निवडणुक भाजपसोबत एकत्र लढवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पालिका निवडणुकीत भाजपसोबत युती

नवी मुंबई महापालिकेसह होत असलेल्या पाच महापालिकेच्या निवडणुकित आरपीआय भाजपसोबत युती करुन निवडणुक लढणार असून पुढील वर्षी मुंबई महापालिकेसह होणाऱया 10 महापालिका निवडणुकित देखील आरपीआय भाजपसोबत राहुन निवडणुक  लढणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

‘कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचेच’

शेतकर्‍यांचे नेते जाणीवपुर्वक त्रास देण्यासाठी आंदोलन वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने आंदोलन करणे योग्य नाही, हा कायदा शेतकर्‍यांच्या फायद्याचाच आहे. शेतकरी नेत आडमुठेपणाची भुमिका घेत असून, हे आंदोलन थांबले पाहिजे अशी आपली भुमिका स्पष्ट केली.

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply