रोह्याचे सुपुत्र संजय बामुगडे यांची निर्मिती
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/09/bahuli-1024x567.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/09/bahuli1.jpg)
रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील किल्ला येथील तरुण संजय बामुगडे याने मुंबईत जाऊन चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुली’ या शॉर्टफिल्मची त्यांनी निर्मिती केली आहे. यू ट्यूबवर ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय बामुगडे यांनी याआधी ‘सरस्वती’ मालिकेसाठी सहनिर्माता म्हणून काम केले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालेल्या ‘उंबुटु’ चित्रपटासाठी त्यांनी सहनिर्माता म्हणून काम केले आहे. त्यांचे स्वतःचे ऑल इज वेल हे प्रॉडक्शन्स असून या प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून आतापर्यंत विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. विविध इव्हेंटही त्यांनी मुंबई व नवी मुंबईसारख्या ठिकाणी केले आहेत. आता त्यांनी आपल्या प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून ‘बाहुली’ ही दोन मित्रांची शॉर्टफिल्म तयार केली आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली असून यू ट्यूबवर प्रदर्शित झाली आहे.