पनवेल : रामप्रहर वृत्त
नाच ग घुमा, कशी मी नाचू…?, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा..!, अशा गाण्यांवर धम्माल करीत आणि साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा असे विविध खेळ खेळत पनवेल तालुक्यातील टेंभोडे गावात श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. 23) करण्यात आले होते. भाजप महिला मोर्चाच्या अॅड. प्रतिभा भोईर यांच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभला.
श्रावण महिना सण, उत्सव, समारंभ घेऊन येतो. हा महिना महिलांसाठीही विशेष असतो, कारण श्रावणात मंगळागौर हा सणही असतो. मंगळागौरीचे व्रत केल्याने नवविवाहितेला अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभते अशी धारणा आहे. म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यात मंगळागौर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, डॉ. संतोष आगलावे, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस लीना पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …